मुख्यपान » इतर साहित्य
A+ R A-
ई-मेल प्रिंट
मंडळाच्या वरील धोरणानुसार बौद्ध धर्मावरील पाली व संस्कृत भाषांत बौद्ध धर्माचे जे वाङ्मय आहे ते मराठी भाषेत आणण्याचे मंडळाने ठरविले. प्रा. धर्मानंद कोसंबी यांचे “बौद्धधर्मावरील चार निबंध”- १. बुद्ध, धर्म आणि संघ, २. बौद्धसंघाचा परिचय, ३. समाधिमार्ग, ४. पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म- मंडळाने पुनर्मुद्रित करण्याचे ठरविले. प्रा. धर्मानंद कोसंबी हे पाली भाषेचे पंडित होते. ज्या देशात त्या धर्माचा उदय व वाढ झाली, त्यातील चालीरीती, साधारण परिस्थिती, विचारसरणी व त्या धर्माविषयी आदर व श्रद्धा त्यांच्या ठायी होती. म्हणूनच त्यांच्या या निबंधांमुळे मराठी वाचकांच्या बौद्ध धर्माच्या ज्ञानात निश्चितत मोलाची भर पडेल यात मला संशय नाही. बौद्धधर्मविषयक सर्व महत्त्वाच्या गोष्टींचा ग्रंथकर्त्याने मोठ्या कुशलतेने संग्रह केला आहे व त्या सुगम करून वाचकांपुढे मांडल्या आहेत. या ग्रंथात श्री. कोसंबी यांनी “धर्म”, “अर्थ” व “काम” या तीनही जीवनअंगांचे सुबोध निवेदन केलेले आहे. मराठी वाचकांची बौद्ध धर्मविषयक जिज्ञासा काही अंशी या ग्रंथरूपाने पुरी होईल असे मंडळास वाटते. धर्मानंद कोसंबी यांचा हा ग्रंथ जनतेला सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

सुरेंद्र बारलिंगे
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,
मन्त्रालय मुंबई – ४०००३२

मुंबई,
पौष, ११, शके १९०३
शुक्रवार दि. १-१-१९८२

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..