मुख्यपान » निवेदन
A+ R A-
ई-मेल प्रिंट
बुद्ध, धर्म आणि संघ
लेखक- धर्मानंद कोसंबी

निवेदन

मराठी भाषेला आणि साहित्याला आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या व सांस्कृतिक मूल्यांच्या आविष्काराचे सामर्थ्य प्राप्त व्हावे, आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी, त्याचप्रमाणे भारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास, कला इत्यादी विषयात मराठी भाषा सर्वच स्तरांवर ज्ञानदान करण्यास समर्थ व्हावी आणि मराठी भाषेला जगात उच्च स्थान मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने बहुविध वाङ्मयीन व सांस्कृतिक कार्यक्रम आखला आहे. तो व्यवस्थितपणे कार्यवाहीत आणण्याकरिता वाङ्मय, ललितकला, समाजविज्ञान, विज्ञान, इतिहास इत्यादी योजनांचे नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने विविध समित्यापण स्थापन केल्या आहेत.

याच दृष्टीने सर्वसामान्य माणसाला उपयुक्त होतील अशा विज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि तंत्रविज्ञान या विषयांवर मंडळ पुस्तके प्रकाशित करते. धर्म हे तर समाजजीवनाचे अंगच आहे आणि मानवी इतिहासाची आपणास ज्या काळापासून माहिती आहे. त्या काळापासून धर्मसंकल्पनेस महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्म ही संकल्पना भारतीय संस्कृतीला मौलिकच आहे. या संकल्पनेचा सर्व बाजूंनी चौकस विचार व्हावयास पाहिजे. अशा अभ्यासामुळे भारतीय संस्कृतीची एकात्मता लक्षात येण्यास मदत होईल. यामुळेच मंडळाने धर्मविषयक पुस्तकेही प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. मंडळाने धर्म या विषयावर आतापर्यंत भारतरत्न म. म. डॉ. काणेकृत “धर्मशास्त्राचा इतिहास” (पूर्वार्ध व उत्तरार्ध) लेख- अनुवादक श्री. य. आ. भट तसेच तिरुवळ्ळुवार विरचित “तिरुवकुरळ” या तामीळ ग्रंथाचा श्री. पु. दि. जोशीकृत मराठी अनुवाद “तिरुक्कुरळ” व बर्ट्रान्ड रसेल लिखित “Religion and Science” या पुस्तकाचा श्री. वि. वा. कुवाडेकर यांनी केलेला “धर्म आणि विज्ञान” हा अनुवादही मंडळाने प्रकाशित केला.

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..