मुख्यपान » अंक पहिला
A+ R A-
ई-मेल प्रिंट
अंक पहिला (प्रस्तावना)

बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असित ऋषीनें त्याचें भविष्य वर्तविलें ही कथा फार प्राचीन आहे (भ. बु. १।९६) तिच्या आधारें ह्या अंकाचे पहिले दोन प्रवेश लिहिले आहेत. बोधिसत्त्वाच्या जन्माच्या सातव्या दिवशीं मायादेवी परलोकवासी झाल्याचा उल्लेख त्रिपिटकांत एक दोन ठिकाणीं सांपडतो. त्याच्या आधारें तिसरा प्रवेश रचला आहे. चवथ्या व पांचव्या प्रवेशाला त्रिपिटकांत आधार नाहीं. बोधिसत्त्व लहानपणापासून स्वतंत्रपणें वागत असावा, पण त्याला शिकार आवडत नसावी ह्या कल्पनेचा ह्या दोन प्रवेशांत समावेश केला आहे. सहावा प्रवेश शाक्यांचें वप्रमंगल व बोधिसत्त्वाची जम्बुवृक्षाखाली बसून ध्यान करण्याची वहिवाट दर्शवीत आहे (भ. बु. १।९१-९२, ९९-१००). सुभद्र कोलिय काल्पनिक पात्र आहे. शाक्य-कोलियांचा शेतीचा धंदा आणि रोहिणी नदीच्या पाण्यासाठी होणारीं त्यांची भांडणें दर्शविण्याकरितां ह्या पात्राचा उपयोग केला आहे. जातकअट्ठकथेंत बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा प्रसंग त्याच्या अत्यंत बालवयांत कल्पिला आहे (जातकट्ठकथा Fausboll’s Edition Vol. I., pp. 57-58). पण ललितविस्तरांत तो प्रसंग बोधिसत्त्वाच्या लिपिशिक्षणानंतर घातला आहे (ललितविस्तार Dr. S. Lefmann’s Edition पृ.१२८-१२९). तो प्रसंग बोधिसत्त्वाला बारा वर्षे झाल्यावर घडून आला असावा असें गृहित धरलें आहे (भ. बु. १।९९-१००).
***********************************************************************************************************************************

पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..