फलक
मुख्यपान » बोधि-सत्व (नाटक)
A+ R A-
ई-मेल प्रिंट
प्रस्तावना

बोधि म्हणजे पूर्णज्ञान; आणि त्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठीं जो अविश्रांत प्रयत्‍न करणारा सत्त्व म्हणजे प्राणी, तो बोधिसत्त्व होय. अत्यंत प्राचीन कालीं हे विशेषण गोतम बुद्धाला त्याच्या जन्मापासून ते त्याला सम्बोधि प्राप्त होईपर्यंत लावीत असत, असें नालक सुत्ताच्या वत्थुगाथांवरून (प्रस्तावनेवरून) दिसून येते. (भगवान बुद्ध १।८४ पहा). त्या बोधिसत्त्वाच्या जीवनचरित्राची त्रिपिटक ग्रन्थाच्या आधारें रूपरेषा आखण्याच्या उद्देशानें हे नाटक लिहिलें आहे.


पुढे वाचा

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे..